संविधानाचे रक्षण काळाची गरज – कविता गेडाम – मडावी

गडचिरोली न्यूज जागर

आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली तर्फे महामानव, जननायक बिरसा मुंडा यांची 147 वीं जयंती साजरी

संविधानाचे रक्षण करणे ही आज काळाची गरज असून या देशातील 85 टक्के बहुजन समाजातील नागरिकांनी संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी वक्त्या कविता गेडाम मडावी यांनी दि. 15 नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील आदिवासी एकता युवा समिती द्वारा आयोजित जननायक बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंती प्रसंगी व्यक्त केल्या.

त्या गडचिरोली येथे आदिवासी एकता युवा समिती द्वारे आयोजित जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता मा. माधव गावड सर हे होते. तर उद्‌घाटक म्हणून मा. मारोतराव ईचोडकर माजी सभापती पं.स. गडचिरोली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. रोहिदासजी राऊत ज्येष्ठ पत्रकार गडचिरोली, आँफ्रोटचे जगदीश मडावी, नागपूर विद्यापीठाचे डॉ. प्रकाश शेडमाके, गौतम मेश्राम, अनिसचे विलास निंभोरकर, सुनिता मरस्कोल्हे बिडीओ सावली, सौ. रंजना गेडाम माजी नगरसेवक, उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी म्हटले कि, क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी भूमी व जंगल संरक्षण तसेच आदिवासींच्या स्वाभिमान व सन्मानाचा क्रांतिकारी लढा लढला असून हा एक ऐतिहासिक लढा होता परंतु इथल्या मनुवाद्यानी आदिवासी, दलित यांचा खरा इतिहासच मिटवून टाकला व त्यांना वर्णभेदा मध्ये गुरफटत ठेवून अंधश्रध्दा पसरवून त्याच्या खऱ्या इतिहासा पासून दूर ठेवण्याच यशस्वी प्रयत्न केला. आज आदिवासी समाज जो काही सुधारीत/सुशिक्षित दिसत आहे ती सर्व संविधानाची किमया असून समाजातील नौकरी करणाऱ्या बांधवांनी नौकरी सोबतच समाज प्रबोधनाचे कार्य करणे आवश्यक आहे. म्हणून ज्या समाज बांधवांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी संविधानचे वाटप समाजातील सुशिक्षित युवकांना करुन संविधानाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळेस व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते असलेले डॉ.वामन शेडमाके यांनी समाज बांधवास मार्गदर्शन करतांना सांगितले कि,
आदिवासींचा मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे. ते सत्ताधारी वर्ग होते आणि त्यांच्याकडे अनेक किल्ले होते. राणा पुंज्या भिल, राघोजी भांगरे, तंट्या भिल, राणी दुर्गावती, वीर बाबुराव शेडमाके यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला असून त्यांचा खरा इतिहास पुढे आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. वामन शेडमाके यांनी केले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. माधव गावड यांनी आदिवासींना संघटित होऊन त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजातील बांधवांनी आपल्या मुलांचे शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्याचे आवाहनही केले. यावेळी इतर पाहुण्यांनीही भाषणे करून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी आदिवासी समाजातील लहान मुली व आदिवासी तरुणांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले.

 

 

यावेळी आदिवासी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. त्यात डॉ.दीपचंद सोयाम, डॉ.तारकेश्वर उईके, डॉ. कीर्तिकुमार उईके, डाँ.प्रांजली उईके, रितेश कोरम, डॉ. सौरभ कन्नाके, सौ. शालिनी कुमरे मँडम, कु. मयुरी सुभाष तोडासे यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुकुंदा मेश्राम, सुखदेव वेठे यांनी केले. तर समितीचे सचिव श्री. प्रदीप कुलसंगे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तर सौ. सारिका उईके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष संजय ऊईके, सचिव प्रदिप कुलसंगे, उपाध्यक्ष माणिक गेडाम, सहसचिव सुधिर मसराम, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, कार्याध्यक्ष संजय मसराम, संघटक/सदस्य मुकूंदाजी मेश्राम, उमेशभाऊ ऊईके, प्रफुल्ल कोडापे, आकाश कोडापे, गिरीष ऊईके, रमेश चिकराम, वासुदेव कोडापे , प्रशांत मडावी, सुखदेव वेटे, संजय चिकराम, हेमाताई कुलसंगे, सारिका ऊईके, माही ऊईके, पिहु ऊईके, तृष्णा सिडाम, रिध्दिमा कुलसंगे, देवयानी ऊईके, माही ऊईके, संजय चिकराम, साहिल आत्राम, माणिक मडावी, गुरुचरण ऊईके, विलास कन्नाके, नागोराव ऊईके, मनिषा मडावी, तुषार मसराम, देवाजी कोडापे, अनुष्का कुलसंगे, रेखाताई कोडापे, सीमा कोडापे, लक्ष कोडापे, तक्ष कोडापे, साई ऊईके, चंद्रकला ऊईके, प्रणाली टेकाम उपस्थित होते.