मसेली येथे आदिवासी एकता युवा समिती शाखा गठीत

by gadchiroli news jagar

मसेली येथे आदिवासी एकता युवा समिती शाखा गठीत
अध्यक्ष लुमेश्वर मडावी तर सचिव सुरेश मेश्राम यांची निवड
गडचिरोली – दि. 26/02/2023 ला गडचिरोली तालुक्यातील मसेली येथे आदिवासी एकता युवा समितीची ग्राम शाखा निर्माण करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेची अध्यक्षता संघटनेचे अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. प्रमुख उपस्थित म्हणून संघटनेचे सचिव प्रदिप कुलसंगे, कार्याध्यक्ष संजय मसराम, सहसचिव प्रफुल कोडाप, आकाश कोडाप आदि प्रामुख्याने उपस्थित पार पडली. यावेळी झालेल्या सभेत संघटनेचे अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके यांनी संघटनेचे महत्त्व, संघटनेचे ध्येय धोरण व समाजात संघटनेचे महत्त्व काय असते यावर मार्गदर्शन केले

मसेली येथे आदिवासी एकता युवा समितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी लुमेश्वर मडावी यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिव पदी सुरेश मेश्राम यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांन मध्ये उपाध्यक्ष टिकाराम मडावी, सहसचिव पुंडलिक आत्राम, कोषाध्यक्ष बंडु रायसिडाम, संघटक घनश्याम मडावी, सदस्य सल्लागार भुपेंद्र गेडाम, कान्हु आत्राम, ढिवरु मेश्राम, रघुनाथ मडावी, रघुनाथ गेडाम, हेमंत मडावी, अशोक सिडाम, रामदास आत्राम, मधुकर आत्राम, शामराव रायसिडाम, रेमाजी मडावी, प्रकाश मेश्राम, हुसन सिडाम, संतोष रायसिडाम, विनुदार पेंदाम, सुमित्रा आत्राम, माधुरी मडावी, निता रायसिडाम, मंगला रायसिडाम, मिनाक्षी रायसिडाम, लक्ष्मण मडावी, दौलत सिडाम, रुषी आत्राम, महादेव मडावी आदि नागरिक उपस्थित होते. सभेचे संचालन बंडु रायसिडाम तर आभार भुपेंद्र गेडाम यांनी मानले.