कोर्टीमक्‍ता येथील मृतक सचिन गायकवाड यांच्‍या कुटूंबियांना आ. मुनगंटीवार यांच्‍यातर्फे आर्थिक मदत मुख्‍यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करणा

बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोर्टीमक्‍ता येथील सचिन दादाजी गायकवाड या २४ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्‍यु झाला. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार भाजपा पदाधिका-यांनी शोकाकुल कुटूंबियांची भेट  घेत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन लवकरच २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य संबंधित कुटूंबियांना मिळवून देण्‍याचे आश्‍वासन भाजपा पदाधिका-यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने दिले. भारतीय जनता पार्टी या दुःखात सहभागी असून पूर्णपणे मृतकाच्‍या कुटूंबियांच्‍या पाठिशी आहे अशा धीर यावेळी भाजपा पदाधिका-यांनी दिला. यावेळी माजी जि.प. सदस्‍या वैशाली बुध्‍दलवार, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, रूपेश पोडे, गणेश टोंगे, भिमराव नगराळे, संजय साळवे, स्‍वप्‍नील टोंगे, सुशिलाबाई कोडाप यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.