भेजगाव येथे रक्तदान शिबिरातून महापुरुषांना अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजन
२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
मूल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलें व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगाव यांच्या विद्यमाने येतील जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम रविवार (दि. १३ ) पार पडला. शिबिरात 21 युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत महापुरुषांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा विजय लोनबले तर विशेष अतिथी म्हणून विलास मोहुर्ले, प्रदीप वाढई, सक्षम संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर, विजय गुरुनुले, येसगाव पोलिस पाटील राजू कोसरे, चिरोली येथील पोलीस पाटील गोकुळ मोहुर्ले, मरेगाव येथील ग्रा. सदस्य आकाश वाकुडकर, उमेद चे प्रभाग समन्वयक मनीष मोहुर्ले, गडिसुर्ला ग्रा.सदस्य प्रीतम आकुलवार, मुन्ना गेडाम, सोनी मोहुर्ले, सारिका बावणे मंचावर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरा करिता जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील रक्तपेढीतील आरोग्य अधिकारी डॉ. दिशा मेश्राम, समाजसेवा अधिष्ठता राकेश शेंडे व त्यांची चम्मू यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे रक्त संकलन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर, आकाश वाकुडकर, मनीष मोहुर्ले, पद्माकर वाढई ,विपुल वाढई ,रिलेश लेनगुरे, संदीप नैताम, चंद्रशेखर मोहुर्ले, मंगेश लेनगुरे, विजय गुरनुले, गितेश शेंडे, राजू कोसरे, मनोज गणवीर, शुभम गुरनुले, गोकुळ मोहुर्ले, शुभम गेडाम, प्रीतम आकुलवार, प्रशांत डोरलीकर,रितिक रापेलीवार, अमर गुरनुले, परिष गांगरेड्डीवार आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन विशाखा गणवीर तर आभार मनोज गणवीर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता नम्रता लाकडे, शालुताई गणवीर, गुलशन लाकडे अभिषेक गणवीर यांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संदीप नैताम यांनी केले 74 व्या रक्तदान
बेंबाळ येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते संदीप नैताम यांनी यापूर्वी 73 वेळ रक्तदान केले असून भेजगाव येथील शिबिराला उपस्थित राहत 74 व्यांदा रक्तदान करीत महापुरुषांना अभिवादन केले.