सार्वजनिक बाल गोपाल उत्सव मंडळ तसेच स्टार क्रिकेट क्लब सिताबर्डी विसोरा यांच्या वतीने रक्तदान शिबिर

श्री. विलास ढोरे , तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर 

आमदार कृष्ण गजबे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास शुभारंभ करण्यात आला.

तालुक्यातील विसोरा येथील सार्वजनिक बाल गोपाल उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. श्री गणेश उत्सवा निमित्त सार्वजनिक बाल गोपाल उत्सव मंडळ व स्टार क्रिकेट क्लब यांनी रक्तदान शिबिर घेऊन आज सामाजिक सहभाग नोंदवला आहे असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

सार्वजनिक बाल गोपाल उत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले. गणेश मंडळाच्या शिबिरात रक्तदान करत सामाजिक कार्यात सहभाग घेतला याचा आनंद झाला अश्या प्रतिक्रिया रक्तदात्यांनी केल्या.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक बाल गोपाल उत्सव तसेच स्टार क्रिकेट क्लब चे अध्यक्ष आकाश बगमारे,रमेशजी कुथे, नितीनजी बन्सोड,पोलीस पाटलीनजी, सुनिल वाघमारे, राजु बोरकर इतर गणेश मंडळ व स्टार क्रिकेट क्लबचे सदस्यांनी सहभाग घेत रक्तदान शिबीर यशस्वी केले.