सावली तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

सावली तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर   

सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथे दुपारी 3 च्या सुमारास जोरदार विज पडून शेतकरी जागीच ठार झालाा.  सोबतच शेतात पाच सहा महिला काम करीत होत्या. त्यापैकी एक महिला गंभीर असून मृतक शेतकऱ्याचे नाव  शरद पंढरी मुनघाटे(५०) आहे , पाथरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मोहोड आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

मृत शेतक-याच्या आकस्मिक मृत्युने कुटुंबावर दुखा:चे सावट निर्माण झाले.तर अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली.

 

                                           —————————–

तर सावली पासून जवळच असलेल्या चकपिरंजी (शाळा हेटी) येथील महिला मंगला सुधाकर येलेट्टीवार (55) शेतात निंदणाचे काम करण्यासाठी गेली,असता दुपारच्या सुमारास विज पडल्याने ती पण जागीच ठार झाली.