तालुका युवक काँग्रेस कमिटीचा इशारा
मुख्याधिकाऱ्याना दिले निवेदन
Shri. Vilas Dhore, Taluka correspondant
देसाईगंज शहर हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असून आजूबाजूच्या गावातील जिल्ह्यातील लोक प्रामुख्याने या ठिकाणी कामानिमित्त येत असतात तथापि देसाईगंज शहरात विविध शासकीय कार्यालय असून खेड्यापाड्यातील लोक सुद्धा आपल्या शासकीय कामाकरिता त्याच मार्गावरून आवागमन करतात, मागील सहा महिन्यापासून स्थानिक प्रवारा चौक मेन रोड वरती मोठे मोठे खड्डे पडून देखील आपल्याकडून गेली सहा महिन्यांपासून खड्डे भरण्यात आलेले नाहीत वारंवार विनंती वजा करून देखील स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे अनेकदा खड्ड्यां पासून स्थानिक नागरिकांना आवागमन करण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे एन पावसाच्या दिवसात वरच्या पाण्यामुळे तूटुंब भरलेल्या खड्ड्यांमुळे त्या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे फवारा चौक देसाईगंज शहरातील एकमेव मेन चौक असल्यामुळे या ठिकाणावरून चारही बाजूने आवागमन मार्गक्रमण केल्या जाते आणि मेन मार्गावरच डांबरीकरण रोड उकलून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन अवागमन करावे लागत आहे करिता येणाऱ्या दोन दिवसात आपल्याकडून खड्डे न भूजविल्यास बेशरमाचे झाडे लावून निषेध आंदोलन तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकुभाऊ बावणे, तालुका युवक काँग्रेस महासचिव पंकज चहांदे, ओबीसी संगघनेचे शहर अध्यक्ष सागर वाढई, शहर युवक काँग्रेस सचिव विवेक गावळे, गोविंदा चिंचोळकर, नरेश लिंगायत,अमित सलामे,अमन गुप्ता उपस्थित होते.