मूल रेल्वे मालधक्काचे काम पून्हा सुरु

मूल शहर प्रतिनिधी न्यूज जागर 

मूल वासियासाठी धोक्याची घंटा
मूल पासून इतर ठिकाणी हलविणे गरजेचे

 

सुरजागड येथून लोहखनीज मोठमोठ्या हायवा ट्रक व्दारे मूल मध्ये आणून साठवणूक करणे व रेल्वेने इतर राज्यात पाठविणे साठी मूल येथील कर्मवीर कॉलेज ग्राऊंड जवळ मालधक्क्याचे काम पून्हा सुरु करण्यात आले आहे . या अवजड हायवा वाहतुक गावाचे मध्यभागातून होण्यामूळे जे चांगले रस्ते आहेत ते पूर्णता खराब होऊन नागरीकांना अपघात व वाहन प्रदुषण यांचा त्रास होईल . या लोहखनीज पावडर मध्ये मानवी शरिरास अंत्यत घातक असलेले घटकद्रव्या पासून दमा कॅन्सर व इतर दुर्धर आजार होतात यासाठी कोणत्याही नागरी वसाहत लगत व गावालगत असा मालधक्का होऊ दिल्या जात नाही जर या प्रस्तावीत डंपीग यार्ड ला आताच इतरत्र न हलविल्यास मूलनगर वासियांना भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे, आलापल्ली येथे सुद्धा नागरिकांनी बंद पुकारलेला आहे.

मूलमधील मार्निंग ग्रुप च्या सदस्यांनी काम बंद पडले असून त्यांनी आव्हान केले आहे कि मूलमधील सर्व नागरीक सर्व पक्षीय नेते व सामाजीक कार्यकर्ते यांनी तात्काळ मिटींग घेऊन हा मालधक्का केळझर चिचपली येथील जंगल परिसरात हलविण्यासाठी आंदोलन करून मूलचा मालधक्का बनविणे करिता विरोध करावा व मार्ग काढावा, लोकांच्या आरोग्यासंबंधीचा हा प्रश्न असून जनप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे , अशी मागणी सातत्याने होत असून सुद्धा जनप्रतिनिधींनी याकडे अजूनही लक्ष दिले नाही असे दिसून येत आहे 

जर हा यार्ड एकदा सुरु झाला तर नंतर हलविता येत नाही याचे गांभिर्य लक्षात घेता या अतिसंवेदनशील मानवी आरोग्यासाठी धोका होऊ नये याकरिता युद्धस्तरावर विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आलापल्ली वासीय ज्या मरण यातनेतून जात आहेत त्याच समस्यांचा सामना मूल शहरातील नागरिकांना करावा लागेल .