रमाई घरकुल आवास योजनेचा वंचित लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्या :- प्रहार सेवक विनोद उमरे

 

श्री अरुण बारसागडे , जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर 

चिमूर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या संवर्गातील नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावे अशी मागणी समाज कार्यरत नेहेमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे. सविस्तर असे आहे की, तालुक्यातील गेल्या दोन ते तीन वर्ष पासुन रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच या वर्षाला चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या मध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे पडझड झाली असून निवारा ही गेला आहे, त्यामुळे चिमूर तालुक्यातील रमाई आवास योजनेपासून वंचित लाभार्थ्यांना त्वरित रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे