नगरपंचायत धानोरा चि पाणी पुरवठा करणारी पाईप लाइन चोरीला

धानोरा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर 

धानोरा, दि,17/09/2022 ला, रात्री,धानोरा येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मेन पाईप लाईन चा,माती खोदून पाईप चोरून नेला , रविवारी सकाळी उमेश जांगी नगरपंचायत कर्मचारी हे टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना पाईप लाईन फूटली आहे असे लक्षात आले यावेळी त्यांनी नगरपंचायतचे वरीष्ठ कर्मचारी गुलाब ठाकरे यांना सांगितले व पाणीपुरवठा सभापती माणीकशाह मडावी व नगराध्यक्ष पौर्णिमा ताई सयाम उपाध्यक्ष ललित बरच्छा यांना सांगितले आणि आज सकाळी नगरपंचायत चे कर्मचारी मोका ठिकानी पाहणी करून धानोरा पोलीस स्टेशनं येते अज्ञाता विरुद्ध फिर्याद दिली पुढील तपास धानोरा पोलीस स्टेशनं करीत आहे.