तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

श्री.अरुण बारसागडे जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

तालूक्यातील बेलगाव येथे विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (दि 20) रोजी सकाळी 7 वाजता चे सुमारास घडली. अंबादास शंकर पाल (53) असे मृतकाचे नाव असून ते बेलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच होते.
म्रूतक हे नेहमीप्रमाणे बेलगाव येथील शेतावर सकाळी सिंचनाकरिता पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेले होते. ते मोटर पंप सुरू करण्यासाठी गेले असता खाली पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन पाथरी यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृत्यू देह उत्तरीय तपासणीकरिता सावलीचे ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. जाणकार आणि अनुभवी सरपंचाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पाथरी चे ठाणेदार मोहोळ यांच्या मार्गदर्शनात पाथरी पोलीस करीत आहेत.