मौजा बोंडे येथे आरोग्य जनजागृती व तपासणी शिबीर संपन्न

श्री. नंदकिशोर वैरागडे, प्रतिनिधी , न्यूज जागर कोरची 

दिनांक- १९/९/२२ ला मौजा बोंडे येथे ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा द्वारे आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन श्री. राजेश फाये साहेब, संवर्ग विकास अधिकारी पं.समिती कोरची यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थान श्री. नेऊरामजी हिडामी यांनी भूषविले. तर प्रमुख मान्यवर म्हणून दयाराम आचले, परदेशी हिडामी, नीलकंठ हिडामी पोलीस पाटील बोंडे, श्री.पासेकर सर मुख्याध्यापक, सुधाकर हीडामी, गावातील इतर प्रतिष्ठीत उपस्थित होते.

मार्गदर्शन पर बोलताना मा.राजेश फाये साहेब, संवर्ग विकास अधिकारी पं.समिती कोरची यांनी गावातील या उपक्रमाचे कौतुक करत विविध विकास कामे व गावातील आरोग्य पोषण सेवांचा आढावा घेत राष्ट्र्पिता सेवा पंधरवडा विषयी मार्गदर्शन केले व गावाला स्वच्छ सुंदर निरोगी बनविण्याचे व त्याबरोबर गावकर्यांना कोरोना लसीकरण बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले. मा. नितीन पंडीत यांनी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता ची गावातील कुपोषण, रक्तक्षय इतर साथीच्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठीची भूमिका याबरोबर कोरोना प्रतीबंधात्मक बुस्टर लसीकरण विषयीचे गैरसमजाना बळी न पडता लस घेण्याचे आवाहन आपल्या मार्गदर्शनात केले. उमेद कार्यक्रमाचे श्री.सहारे सर यांनी गावातील बचतगट सक्रीय करून आजीविका सुधार करण्याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती साखरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात किशोरवयीन मुली व माता यांच्यातील रक्तक्षय विषयी माहिती दिली.
मेश्राम मॅडम सिएचओ नवेझरी, आरोग्य सेविका दडमल, एमपीडब्लू खुणे, श्री.नखाते मानसेवी वैधकिय अधिकारी आरोग्य केंद्र नवेझरी यांच्या उपस्थितीत गावकर्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी व इतर आजार यांची तपासणी व 24 गावकर्यांना कोरोना प्रतीबंधात्मक लसीचा बुस्टर डोस देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बनसोड सचिव ग्रा. पं. नवेझरी, संचालन श्री.किशोर कुथे जि. प. प्रा शाळा बोंडे तर आभार प्रदर्शन श्री. चेतन चौधरी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताराबाई सिंद्राम, मनुराम हारामी, सहादेव कल्लो,दयारोबाई मडावी, अनिता हारामी, निलवंती हारामी, वालीबाई कल्लो रामदास आचले, श्रीराम पुराम, वासुदेव कल्लो, सुकलाल हिडामी, सुरेश आचले, रामलाल कल्लो सहदेव कल्लो, संदीप मडावी, सोनाली जांभूळकर, व समस्त बोंडे ग्रामवासी यांनी सहकार्य केले.