गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
गडचिरोली, ता.२३ :
केंद्र सरकारच्या सहसचिव इंद्रा मालो यांनी चामोर्शी तालुक्यातील घोट येथील अंगणवाडी क्रमांक ५ ला गुरुवार (ता. २२) भेट दिली.
यावेळी त्यांनी विशेष आहार पाककृती व अंगणवाडीबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेल्या बालकांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला. अंगणवाडीसेविकांनी तयार केलेल्या आहार प्रदर्शनाला मालो यांनी भेट देऊन गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष आहार पाककृतीबद्दलही माहिती जाणून घेतली. या भेटीत त्यांनी पोषण ट्रॅकर कामकाज आढावा व मार्गदर्शनही केले. यावेळी सहसचिव मालो व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी इंगोले यांनी स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर उपस्थित होते. त्यानंतर घोट येथील अहल्यादेवी बाल सुधारगृहाला त्यांनी भेट दिली. सहसचिव इंद्रा मालो यांनी येथील मुलींशी संवाद साधला व कार्यालयाची पाहणी केली. या दोन तासांच्या भेटीत त्यांनी व्यवस्थापनाबाबत कर्मचा-यांच्याशीही संवाद साधला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालकल्याण विभाग व संबंधित कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.