दुर्लक्षित व जिर्ण झालेल्या बस स्थानकाची पोलीस जवानांनी श्रमदानातुन केली डागडुजी व रंगरंगोटी

श्री.नंदकिशोर वैरागडे,प्रतिनिधी,न्यूज जागर 

प्रेसनोट

पोलीस मदत केंद्र कोटगूल दिनांक २७/०९/२०२२

कोटगुल येथील बस स्थानक हे मागिल २० वर्षांपासुन दुर्लक्षित असून त्याची दुर्दशा झाल्यामुळे प्रवाशांना निवारा घेण्याकरीता गैरसोयीचे झाले होते

पोलीस मदत केंद्र कोटगुलने सर्वागिण विकासाकरीता कोटगुल हे गाव दत्तक घेतल्याने ग्रामपंचायत

कोटगुल यांच्या संयुक्त विद्यमानाने दुर्लक्षित असलेल्या व जिर्ण झालेल्या बस स्थानकाची स्थानिक ग्रामस्थ व

पोलीस जवानांनी श्रमदानातुन डागडुजी व रंगरंगोटी करून प्रवाशांकरीता सुलभ करण्यात आले व आसरा

उपलब्ध करून प्रवाशांना उण, वारा, पाऊस यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्तता केली.

असे प्रेसनोटद्वारे श्री.नरेंद्र संजय पिवाल, पोलीस उपनिरीक्षक , पोलीस मदत केंद्र कोटिगुल , यांनी कळविले आहे

 

सदर कामगिरीमुळे कोटगुल परीसरातील समस्त ग्रामवासियांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे व श्री पिवाल साहेब यांचे  कामगिरीचे कौतुक करून,आभार व्यक्त केले.