गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहखनिज उत्खननाचे काम सुरु असून दररोज ट्रकव्दारे प्रमाणात लोहखनिज वाहतुक केली जाते. स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाकरिता विरोध असतांनाही हे प्रकल्प सुरु करण्यात आले असून अनेकदा अपघात घडले आहे. आष्टी- आलापल्ली रोडवरील शातीग्राम येथे आज 27 सप्टेंबर रोजी दुपारी साधारणतः २.३० वाजता लगाम नजीक दुचाकी स्वारास लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक ने धडक दिली असता दुचाकीवर असलेली महिला नामे बिजोली शुभास जयदार रा कांचनपुर जि. गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी सुरजागड प्रकल्पात लोहखनिज वाहतुकीस असलेल्या 7 ते 10 ट्रकची जाळपोळ केल्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.