श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी पासून जवळच असलेल्या आवळगाव येथील शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली.
ब्रह्मपुरी पासून 35 किलोमीटर अंतरावरील आवळगाव या गावातील महिला धृपता श्रावण मोहुर्ले वय 55 ही बोधनी नदी घाटा जवळील शेत शिवारात निंदन करीत असताना वाघाने आज दुपारी चारच्या दरम्यान तिच्यावर हल्ला केला त्यात ती जागीच ठार झाली याआधी सुद्धा अशा अनेक घटना आवळगाव येथे घडली असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी जनतेकडून मागणी होत आहे. Killed By Tiger
पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस व वनाधिकारी करत आहेत.