चामोर्शी तालुक्यात वाघाचा शेतमजूर महिलेवर हल्ला

 

चामोर्शी तालुक्यातील गिलगाव सुमनबाई काजी भोयर (60) मु.पोस्ट गीलगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली  या महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी दुपारी 02.30 वाजताच्या सुमारास घडली आहे .

Attack by tiger

 

शेतात गवत कापत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात त्या गंभीर जखमी झाल्या. तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नरभक्षक वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.