Shri Vilas Dhore, Correspondent News Jagar
५.३० वाजताच्या सुमारास गोंदियावरून बलारशहाला जाणारी लाईट्स गुड्स नावाची मालगाडी प्लॅटफार्मवरून जात असताना अंदाजे ३० वर्षीय युवकाने अगदी गाडीच्या समोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.
या युवकाची ओळख पटू शकली नाही. उत्तरीय तपासणीसाठी मृतकास ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला असून त्यामुळे ओळख पटली नव्हती.
दिवसोंदिवस रेल्वेत सापडून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे रेल्वे विभागही चिंतेत पडला असल्याचे दिसत आहे