धान खरेदित शेतकऱ्यांची गळचेपी थांबविण्यात यावी -देसाईगंज युवक कॉंग्रेस कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

श्री विलास ढोरे वडसा तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर

देसाईगंज- शासनाने जारी केलेल्या नविन ॲप नुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांधावर जाऊन ई-पिक नोंदणी ॲपवर केली असताना व ई-पिक नोंदणी करीता स्थानिक तलाठ्यांना निर्देश देण्यात आले असताना संबंधित शासकीय धान खरेदी केन्द्रावर धान विक्रीसाठी टोकण पद्धतीने नंबर लावण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करून गळचेपी केली जात आहे. यामुळे शासनाच्या गाईडलान नुसार ई-पिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेता शेतऱ्यांची करण्यात येत असलेली गळचेपी तत्काळ थांबविण्याची मागणी देसाईगंज तालुका युवक कमिटीची देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे यांच्या मार्फत गडचिरोली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात बावणे यांनी नमूद केले आहे की, देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जाऊन धान पिकाची ई-पीक नोंदणी केली असून सदर धान उत्पादनानंतर विक्री करिता शासकीय धान खरेदी केंद्रावर नेण्याकरिता प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही दिवसापूर्वीच जिल्ह्यातील तलाठ्यांना शेतकऱ्यांचे सातबारा ई-पीक करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. असे असताना शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना टोकन साठी उभे करून शेतकऱ्यांची गडचेपी करण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे.
शासनाने निर्देशित केलेल्या नोंदणी धोरणानुसार नविन वर्जन सॉफ्टवेअर मध्ये जोडून शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणी करण्यासाठी व सदरचे पीक पाहणी करून उत्पादित शेतमाल जसे धान मका इत्यादी असे सहा पीक नोंदणी करून ते शासकीय हमीभावाने विक्रीकरिता शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता सॉफ्टवेअर मध्ये नवीन वर्जन तयार करून ते शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळावा हा या मागचा शासनाचा उद्देश आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले पिकांचे ई- पीक नोंदणी करून सदर चे धान महामंडळाला देण्याकरिता सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील आता खरेदी विक्री संस्था त्यांना टोकन घेण्याकरिता रांगेत उभे करीत आहे.
आपले नंबर लवकर लागावे यासाठी शेतकरी रात्रंदिवस टोकन केंद्रावर जमा होऊन आपल्या जीवाचे हाल करीत आहेत. खरे पाहता ज्यांनी पीक नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या नावाची यादी त्यांच्या परिसरातील सहकारी संस्था किंवा महामंडळ यांच्याकडे सादर करून त्या त्या भागातील शेतकऱ्यांना आपले धान्य विक्रीसाठी नेणे सोयीचे होईल अशी प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे. माञ तसे न करता दोन- दोन, तीन-तीन दिवस रांगेत उभे करून टोकन मिळवण्याच्या नावाखाली शासकीय धोरणानुसार शेतकऱ्यांची गडचेपी करण्यात येत आहे. होत असलेली गडचेपी तत्काळ थांबविण्यात यावी व ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले ई-पीक नोंदणी पूर्ण केली आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीनुसार त्यांना क्रमवारी देऊन सरसकट धान विक्रीकरिता केंद्रावर बोलविण्यात यावे अशी मागणी देसाईगंज युवक काँग्रेस कमिटीच्या वतिने जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधींनी स्विकारले असुन यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु नरोटे, तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत, शहर अध्यक्ष आरीफ खानानी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे, महिला तालुका अध्यक्षा आरती लहरी, शामिता नंदेश्वर, पद्मा कोडापे, राहुल सिडाम, तालुका महासचिव पंकज चहांदे, पुष्पा कोपरे, विवेक गावडे, दुषांत वाडगुरे, राकेश पुरणवार, सुनिल चिंचोळकर, वहिद खान पठाण, घनश्याम कोकोडे आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.