पशुसंवर्धन विभाग व पोलीस मदत केंद्र बेडगाव यांचे संयुक्त दिद्यमाने लंम्पी चर्मरोग डोस लसीकरण

श्री. नंदकिशोर वैरागडे , कोरची प्रतिनिधी,न्यूज जागर

प्रेस नोट

पशुसंवर्धन विभाग व गडचिरोली जिल्हा पोलीस अंतर्गत मा. अंकीत गोयल सा.पोलीस अ गडचिरोली, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री समीर शेख मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत दिनांक २९/०९/२०२२ लम्पी चर्मरोग डोस लसिकरण चा कैम्प आयोजन करण्यात आले.

 

मागील महीण्यापासून जनावरांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव हा खुप जास्त प्रमाणात पहायला मिळाला यामध्ये अनेक जिल्हयातील जनावरांना लम्पी रोगाची लागन झाल्याने जास्त प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडल्याचे दिनदर्शनास आले आहे. पोलीस मदत केंद्र, बेडगाव हृद्विमध्ये कोणतेही जनावरांना लम्पी रोगाची लागन होवु नये या दृष्टीने लंम्पी चर्मरोग लसिकरण कॅम्प आयोजीत करण्यात आला. सदर आरोग्य शिबीर मध्ये पशुसंवर्धन विभागाचे १) डॉ. स्वप्नील खंडाते, पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत समीती कोरची २) डॉ. एम.आर. ढाकणे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प.वै.दवाखाना कोरची, श्रीमती बोरकर, श्री विकास गजभीये, श्री दिनेश सहाळा त्यांचा संपूर्ण स्टॉफनी पोमके बेडगाव मधील सर्व पशुनां लम्पी लसीरण दिले. लसीकरण घेणे करीता पोमके बेडगाव मधील अनिल नाणेकर प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र बेडगाव, नापोअ दिवाकर घरत, पोअं विभीषण अनवणे पो] अमोल निमगडे व सर्व पोलीस अंमलदार यांनी जनावरांना लस घ्या अशी जनजागृती केली. सदर आरोग्य शिबीरला पोमके बेडगाव हद्वितील ५२३ जनावरांपैकी ५०३ जनावरांना लम्पी धर्मरोग लस देण्यात आली.