श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दिनांक 28/ 9 /2022 रोजी मेंढा माल या गावातील रहिवासी ईश्वर कवडू परचाके वय 60 वर्ष यांचा रात्री बारा वाजता दोन अज्ञात मारेकऱ्यांनी घराचे समोरील रस्त्यावर कुऱ्हाडीच्या सहाय्याने डोक्यात घाव घालून ठार मारले व ते जंगलाच्या दिशेने अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर माहितीवरून तात्काळ घटनास्थळी पोलीस पथकासह भेट देऊन खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे तसेच एस डी पी ओ मुल श्री मल्लिकार्जुन इंगळे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व सिंदेवाही पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. सिंदेवाही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या दोन विविध तपासाचे पथके तयार करण्यात आले. अथक परिश्रमानंतर सदर गुन्ह्यामधील अज्ञात मारेकरी यांना निष्पन्न करण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले.The unknown killers who escaped after murdering were arrested in 24 hours by Shindewahi police
गिरगाव येथे राहणारे नामदेव तुकाराम अत्राम व त्याचा साथीदार धर्मराज घनश्याम येवणकर यांनी जुन्या वादाचा राग मनात ठेवून सदरचे क्रूर कृत्य केले असल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे. पोलीस निरीक्षक योगेश घारे, Psi महल्ले, देवानंद सोनुले, रणधीर मदारे, ज्ञानेश्वर ढोकळे, राहुल रहाटे, मंगेश श्रीराम यांनी सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणून गुन्हेगारांना बेड्या ठोकलेल्या आहेत.