मुलचेरा तालुक्यातील महिला सरपंचास १८००० हजाराची लाच घेतांना अटक

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

रस्ता बांधकामांचे चेक देण्यासाठी 31 हजार रुपयांची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपुर येथिल सरपंचा श्रीमंती भावना शैलेन मिस्त्री यांना त्यांच्या राहत्या घरी तडजोडीअंती १८००० रुपयांची लाच घेतांना 29 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले

Women sarpanch arrested by Anti-Corruption-Bureau while accepting bribe

याप्रकरणी सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री यांच्यावर पोलीस स्टेशन मुलचेरायेथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, पो.ना. श्रीनिवास गोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, चापोहवा तुळशिराम यांनी केली.