श्री.विलास ढोरे वडसा तालुका प्रतिनिधी न्यूज जागर
देसाईगंज।
जगाला शांती अहिंसा करुणा व मैञीचा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्धाचा धम्म आचरणात आणल्याशिवाय मानुस आद्ध्यात्मीक प्रगती करु शकत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा दिल्यानंतर आपण स्वताला बौद्ध समजुन घेत असलो तरी आचरणातुन ह्या धम्माची संस्कृती अंगिकारुन समाज बांधवांनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करावा असे प्रतिपादन दि बुद्धिष्ट सोसायटि ऑफ इंडीयाचे नागपुर विभागिय अध्यक्ष विजय बंसोड यांनी केले । देसाईगंज येथिल आशिर्वाद कॉलनितिल संबोधी बुद्ध विहारात आज २ आक्टोबर ला बौद्ध समाज कोअर कमेटी च्या माध्यमातुन चला विहारात जाऊया हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला विजय बंसोड यांचेसह बुद्धिष्ट सोसायटी चे जिल्हाध्यक्ष इंजि नरेश मेश्राम कुषाबराव लोणारे डाकराम वाघमारे हंसराज लांडगे अड् बाळकृष्ण बांबोळकर मारोतराव जांभुळकर प्रकाश सांगोळे साजन मेश्राम पवन गेडाम शेवंता बंसोड कविता निरांजने टिना ठवरे निमा बागडे यांचेसह परिसरातिल बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या या प्रसंगी मार्गजर्शन करतांना विजय बंसोड म्हणाले की तथागत भगवान बुद्धाचा जन्म भारतात झाला त्यांनी उपदेशिला बौद्ध धम्म जगभर प्रसारित झाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा दिल्यामुळे आंबेडकरी समाजाची ओळख बौद्ध म्हनुण होत असली तरी खर्या अर्थाने या समाजाला व्यक्तिगत जिवनामध्ये बौद्ध धम्माच्या तत्वद्न्याना नुसार आपले आचरण करणे आवश्यक आहे शिल पालनासह आर्य अष्टांगिक मार्गावर मार्गक्रमण करुनच मानव जिवनाचे ध्येय गाठुन आद्ध्यात्मिक प्रगती करु शकतो बौद्ध संस्कृती च्या निर्मितीसाठी धम्माचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन विजय बंसोड यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलिप इंदुरकर विजय बागडे बडोलेसर यांनी यथोचित प्रयत्न केले या कारयक्रमाला बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ।