गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
आरमोरी तालुक्यातील देशपूर (कूरंजा) येथे वाघाच्या हल्ल्यात ठेमाजी माधव आत्राम ठार झाल्याची घटना आज अंदाजे एक वाजताच्या दरम्यान घडली.
देशपूर येथील रहिवासी असलेल्या ठेमाजी माधव आत्राम वय 58 वर्ष हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी जंगलामध्ये गेले होते. गुरे चारत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून काही अंतरावर फरकडत नेऊन त्यांना ठार केले.
या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
तसेच या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी असल्याची माहिती मिळालेली आहे. या प्रकरणाने गावात तणाव निर्माण झाला असून अजून किती लोकांचा जीव जाणार असा संतप्त सवाल गावकर्यांनी केला आहे त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.