सावरगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच शस्त्रक्रिया, प्रसूती रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. परंतु याचा ताण रक्तपेढ्यांवर पडून रक्ताचा साठा कमी पडू लागलेला आहे. रुग्णांना रक्ताची कमतरता पडू नये, रुग्णांचे रक्तासाठी हाल होऊ नये यासाठी नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील माजी पोलीस पाटील डॉ. भिवाजी बळीरामजी पा. बोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्य शुक्रवारी सावरगाव येथे श्री विश्वेश्वर भिवाजी पा. बोरकर यांचे राहते घरी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णापर्यन्त रक्त पोहचविण्यास मदत करण्याचे पुण्यात्मक कार्य करावे. असे आवाहन सर्पमित्र श्री घृष्णेश्वर भिवाजी बोरकर यांनी केले आहे.