मोखाळा येथील महीलेचा वीषारी साप चावून मृत्यू

BY shri Arun Barsagade

चिमूर तालुक्यातील नेरी जवळील असलेल्या मोखाळा येथील जया चीतांमन तामगाडगे वय- ५० वर्ष या महीलेचा राञोला झोपेत असतांना वीषारी साप चावल्याने नागपुर मेडीकलला नेत असताना जया तामगाडगे या महिलेचा मृत्यु झाला आहे.

सवीस्तर वृत्त असे आहे की, नेरी जवळील मोखाळा येथील चींतामन तामगाडगे व त्यांची पत्नी जयाबाई चिंतामन तामगाडगे हे १० ऑक्टोबंरला राञोला जेवन करून झोपी गेलेत. १२ वाजताच्या नंतर राञो २.३० वाजता जयाबाई तामगाडगे या झोपेत असतांना काही तरी चावल्याचा स्पर्श झाला. यावेळी ती जागी झाली चावा घेतल्याच्या ठिकाणी पाहताच वीषारी सापाने चावा घेतला असल्याचे कळताच लगेच जया ला उपजील्हा रूग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात ३-४ तास उपचार घेतल्यानंतर ११ ऑक्टोबंरला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपुर मेडीकलला रेफर केले. पण नागपूर मेडीकलला पोहचण्यापुर्वीच नागपुर येथील दीघोरी जवळ जया ची प्राणज्योत मालवली.

जयाच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मोखाळा येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .