वैनगंगा नदी पात्रात अनियंत्रित स्कार्पिओ कोसळली

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

गोंडपीपरी हुन आष्टि कडे जात असताना आष्टि गोंडपिपरी जवळील
वैनगंगा नदी पात्रात अनियंत्रित होऊन स्कार्पिओ वाहन कोसळायची घटना गोंडपिपरी ते आष्टि दरम्यान नदीवर घडलेली आहे , नदी पात्रात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहन कुठले  आणि त्यात असणारे प्रवाशी कोण आणि किती लोक आहेत याबाबत अजून पर्यत माहीती कळू शकली नाही . पोकलॅण्ड मशीन च्या साहाय्याने प्रवाशी सुखरूप काढण्यासाठी प्रशासन चे प्रयत्न सुरू आहेत .
घटनेची माहिती कळताच तहसीलदार के.डी. मेश्राम आणि गोंडपीपरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार जीवन राजगुरू
घटनास्थळी दाखल झाले आहेत.