श्री विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
शहरातील बहुचर्चित आंबेडकर वार्डातील आशिष रवी मेश्राम हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीसह तीन आरोपिंना अटक करण्यात आल्यानंतर झालेल्या खुलाशात सदर हत्याकांड अनैतिक संबंधातुन घडवून आणल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कटात सहभागी मृतकाची पत्नी सपना मेश्राम हिला अटक करण्यात आल्यानंतर संतत्प नागरिकांनी आशिषच्या सर्व हत्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे यांना दिलेल्या निवेदनातुन केली असल्याने एकुणच प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहराच्या आंबेडकर वार्डातील आशिष मेश्राम ११ ऑक्टोबरच्या राञी ८.३० वाजताच्या सुमारास घरून मोटारसायकलने निघुन गेल्यानंतर शहराच्या भगतसिंग वार्ड ते तुकुम वार्ड मार्गावरील नहराच्या पाण्यात तरंगताना प्रेतच आढळून आल्याने प्रकरणाशी संबंधित आरोपिंचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरू लागले होते.दरम्यान करण्यात आलेल्या कसुन चौकशीतून विशाल रामभाऊ रेखडे (२४वर्षे)या मुख्य आरोपिस २४ तासाच्या आतच अटक करण्यात यश मिळवल्या नंतर दरम्यान रेखडेस बोलते केले असता प्रकरणाशी संबंधित शहराच्या कस्तुरबा वार्डातील निकेश पितांबर अणोले (२२ वर्षे) उर्फ नाऱ्या, देसाईगंज तालुक्यातील शंकरपुर येथील दुर्गेश देवानंद गाधाडे (२२ वर्षे)तसेच आंबेडकर वार्डातील संतोष लेकचंद मेश्राम (२२ वर्षे)या तीन आरोपिंना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली.
आशिष मेश्राम हा ११ ऑक्टोबर २०२२ रोजी राञी ८.३० च्या सुमारास घरी पत्नीने जेवणाचा ताट केला असता कुणाचा तरी फोन आल्याने पत्नीला थोड्या वेळात येतो म्हणून सांगुन गेल्यानंतर पत्नीने कुठेही शोधाशोध न करता आशिषचा खुन करण्यात आल्यानंतर एक तासाच्या अंतराने देसाईगंज पोलिस ठाणे गाठुन पती हरवले असल्याचा बनाव करीत तक्रार दाखल केली होती.माञ प्रकरणाशी संबंधित चार आरोपिंना अटक करून बोलते करण्यात आले असता सदर प्रकरण हे अनैतिक संबंधातुन घडले असल्याचे समोर येऊ लागले होते.दरम्यान मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयानातुन मृतकाच्या पत्नीनेच हा हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येताच देसाईगंज पोलिसांनी आरोपी सपना हिलाही अटक केली असल्याने या प्रकरणात आता एकुण आरोपिंची संख्या पाच झाली असुन आणखीही काही आरोपिंचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान ही गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या आशिष मेश्राम यांचा अनैतिक संबंधातुन पत्नीनेच हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येऊ लागल्याने एरव्ही शांत असलेले देसाईगंज शहर पुरते हादरले.यामुळे संतत्प शहरवाशियांनी या विरोधात आक्रमक पाविञा घेत आशिषच्या हत्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शहराच्या मुख्य मार्गांवरुन मुक मोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.यावेळी शहराच्या विविध वार्डातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.