श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
नागभीड तालुक्यातील पान्होळी गावातील गुराखी स्वताच्या शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र.६६९ या वनात गेला,तेव्हा दबा धरुन बसलेल्या वाघाने सत्यवान पंढरी मेश्राम(६०) या गुराख्यावर हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना सोमवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली.तो नरभक्षी वाघ आपला मार्ग बदऊन आता पारडी गावा जवळ अनेक व्यक्तीच्या दृष्टीता पडला आहे. जंगलाला लागुनच अनेक शेतकऱ्यांनच्या शेत्या असल्याने त्यांच्या मध्ये भिती निर्माण झाली आहे.सध्या शेतात धान पिक उभा आहे.पाऊसाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी धान कापनी थांबली आहे.तरी सुद्धा दिवसातुन एक वेळ तरी शेतकरी आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी जात असतो.पण या नरभक्ष वाघाच्या भितीने आपल्या शेतात कोणी व्यक्ती जाण्यास धजावत नाहीत. दिवाळीचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. शेतात धान पिका बरोबरच जोड धंदा म्हणून भाजी पाल्याचीही लागवड केली आहे .तो भाजीपाला विकून चार पैसे मिळऊन आपल्या कुटुंबाची दिवाळी चांगली होईल या आशेत असतांना अगदी वेळेवर या वाघाने शेता जवळच दर्शन देणे सुरु केलेआहे.त्या मुळे शेतातील भाजीपाला तोडण्यास कसे जावे हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे.ब्रम्हपूरी वनविभागा अंतर्गत येत असलेल्या सायगाठा परीसरात मागील जुलै महीण्यात वाघाने चांगलाच उच्छांक मांडला होता.राज्य महामार्गावर अनेकांना त्याने दर्शनही दिले होते.त्या वाघाने तिन व्यक्तींचा बळी सुद्धा घेतला होता.वनविभागाने त्या वाघाला जेरबंद करण्यात यश संपादन केले होते.पुन्हा एका वाघाने आपले डोके वर काढुन दोन दिवसाअगोदर पान्होळी या गावातील गुराख्यावर हल्ला करुन त्याचा नरडीचा घोट घेतला आहे.पुन्हा वन्यजिव व मानव यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने या पारडी गावाच्या परीसरात फिरणार्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी धोर धरु लागली आहे.