कोरची तालुक्यात दुचाकी स्वारावर हत्तींचा हमला

श्री.श्याम यादव , कोरची तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

कोरची मुख्यालयापासून अंदाजे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर कोरची ते कुरखेडा मार्गावर सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान कोरची येथील व्यापारी दामोदर कुंभारे व त्यांचा मुलगा विनायक कुंभारे हे दोघे वडसा येथे काही कामानिमित्त दुचाकिने गेले असता परत येताना ढोलीगोटा देवस्थाना नजीक अंदाजे 20 ते 25 हत्तींचा कळप दिसून आला. अचानक दुचाकी समोर आलेल्या हत्तीमुळे दुचाकी चा तोल बिघडला व हत्तीच्या हमल्यापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात आपली दुचाकी नेली त्यात दामोदर कुंभारे व विनायक कुंभारे यांना गंभीर दुःखापत झाली. कुठलीही अनुचीत घटना घटू नये याकरिता त्या दोघांनी आपली दुचाकी तिथेच सोडून तेथून पळ काढला. विनायक कुंभारे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक हत्ती आपल्या सुंडेणे विनायक यांच्यावर हल्ला केला परंतु तो हल्ला चुकविण्यात कुंभारे हे यशस्वी झाले. विनायक कुंभारे यांना हाताला जबर मार बसलेला आहे व त्यांचे वडील दामोदर कुंभारे यांना छातीला जबर दुखापत झालेली आहे त्यांना उपचाराकरिता ब्रह्मपुरी येथे दवाखान्यात नेण्यात आले आहे. यापूर्वी 21 ऑक्टोम्बरला तालुक्यातील लेकरूबोडी येथे याच हत्तींच्या कळपाने शेतातील धान्याची नासाडी केली व त्या परिसरातील घरांची तोडफोड केली व यात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला गंभीर जखमी केले होते. तालुक्यात दाखल झालेल्या हत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.