श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
ग्रामीण भागातील विद्यार्थीही घेऊ शकतील आता इंग्रजीचे धडे
सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी राज सरकारने जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद शाळांमध्ये केजीचे वर्ग लवकरच सुरू करणार असल्याचा मानस सरकार करीत आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठी शाळाबाबत शासन उदासीन असून 20 पटसंख्यापेक्षा कमी असणाऱ्या मराठी शाळा बंद करण्याचा बेत सरकार करीत आहेत. या शाळा बंद करू नये याकरिता शिक्षक, शिक्षकप्रेमी व अन्य पक्षांनी बंड पुकारले असून शाळा वाचविण्यासाठी मोर्चे, आंदोलने, भजन असे अनेक लक्षवेधी कार्यक्रम करीत आहेत.
जिल्हा परिषद मराठी शाळेतील पटसंख्या कशी वाढेल याबाबत शासन आता प्रयत्न करीत आहे. पटसंख्या वाढीच्या दृष्टीने राज्य सरकार आता जिल्हा परिषद शाळेत ज्युनिअर आणि सीनिअर केजीचे वर्ग सुरू करणार आहे या माध्यमातून गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागानं म्हटलं आहे. या निर्णयामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा इंग्रजी शिक्षणाचे धडे घेऊन शिक्षणात नवक्रांती घडेल.