श्री.अनिल गुरनुले , अहेरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
प्राणहीता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस जवान चंदू मज्जरवार वय 46 वर्ष राहणार आल्लापल्ली , मुळगाव अहेरी जवडील मोहुमतूर्रा या गावचे रहिवासी असून ते 1996 मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते. बुधवारी सकाळी प्राणहिता पोलीस उप मुख्यालयात गिनती करून ते घरी जात असताना. अहेरी येथील प्राथमिक केंद्र शाळेजवळ दुचाकी वर बसून असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि ते तिथेच कोसळले. त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्य घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. .
.