नंदकिशोर नल्लुरवार प्रतिनिधी न्यूज जागर, चामोर्शी.
चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागपूर चक गावातील शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गाव दारुबंदी ठराव घेण्यात आला. मात्र या ठरावाला केराची टोपली दाखविण्यात आली असून राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जात असून तत्काळ या गावातील दारुबंदी करण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
गावातील वाढत चाललेली व्यसनाधीनता लक्षात घेऊन त्याला अटकाव करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मुक्तीपथ व दारू तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रमा अंतर्गत १६ मार्च २०२२ रोजी खास ग्रामसभा घेऊन सभेत ग्रामस्तरीय दारू व तंबाखूमुक्त ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. त्यात अध्यक्ष सरपंच शेवंता गेडाम उपाध्यक्ष, उपसरपंच सौरभ पाल, सचिव ग्रामसेवक आर. डी. शेंडे, सहसचिव अनिता ठेमस्कर., सदस्य गोपिका गेडाम, रुपाली मोहुर्ले, संगिता मोडेमवार, भाग्यश्री चिंतलवार, पुष्पा आभारे, पुष्पा वाळके, पुष्पा आभारे, पोलिस पाटील अनिल कुकुडकर, पोलिस पाटील आनंदराव कुळमेथे, पोलीस पाटील वैशाली वन्नेवार, वर्षां बट्टे, ज्योती सोमनाथे,परशुराम कुळमेथे, चिंतामण कुमरे, किरण मेश्राम, शशिकला तीर्थलवार, आशा मोडेमवार , चित्रकला कारकूरवार, पूजा वाळके, गणेश जुवारे, पूनम कुनघाडकर या २५ जणांचा समितीत समावेश आहे. समिती असताना सुद्धा व ग्रामपंचायत ठराव सर्वानुमते गावातील दारुबंदी करण्यासाठी ग्राम स्तरीय दारुबंदी पारित करून आज सात महिन्याचा कालावधी होत असून दारूमुक्त झाला नसल्याने सुजाण नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.