श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
नवरगाव अंगणवाडी बैटरी व इनव्हर्टर चोरी प्रकरण
नवरगाव –
सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथील अंगणवाडी दरवाजाचा कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोलरची बॅटरी व इन्व्हरटर चोरी झाल्याची घटना मंगळवारला उघडकीस आल्यानंतर सिंदेवाही पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात कलम ४६१ , ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीचे साहीत्य विकत घेतल्याप्रकरणी पंचायत समीती माजी सभापती मंदा बाळबुध्दे यांचे पती राजेश्वर बाळबुध्दे (६३ ) यांचेवर कलम ४११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी अनुक्रमांक ४ चे आरो मशीन , फॅन , लाईट या विदयुत उपकरणाच्या सोलर सिस्टीमच्या वापराचे बॅटरी , इनव्हरर्टर उपकरण मंगळवार ला सकाळी १० वा. अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सुरू करण्याकरीता आली असता अंगणवाडीचे दरवाजाची कडी वाकलेल्या खुल्या अवस्थेत दिसून आल्याने चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते. या चोरी बाबत सिंदेवाही
पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सिंदेवाही पोलीसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिंदेवाही पोलीसांनी चोरी तपास यंत्रणा फिरवताच चोरीचे साहीत्याची गोपनीय माहीती प्राप्त होताच पंचायत समीतीच्या माजी सभापती रत्नापूर इंदीरानगर रहीवासी घराची झाडाझडती घेतली असता बॅटरीचे साहीत्य आढळून आले. माजी सभापतीचे पती सेवानिवृत्त कर्मचारी राजेश्वर बाळबुध्दे यांनी सदर उपकरण विनोद नुतीलकंठावार यांचेकडून दोन हजार रूपयात विकत घेतल्याची सिंदेवाही पोलीस समोर बतावणी केली आहे. ४० ते ५० हजार रूपये किंमत असलेले सोलरचे उपकरण दोन हजार रूपयात घेतले असल्याचे पोलीसांना सांगितले असल्याने या प्रतिष्ठित व्यक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे. यापूर्वी यांनी किती चोरी केलेल्या वस्तू खरेदी केल्या आहेत हा एक प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे.
नवरगाव परिसरात विविध साहीत्य चोरीच्या घटना घडल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सिंदेवाही पोलीसांनी साहीत्य जप्त करून राजेश्वर बाळबुध्दे यांचे विरोधात कलम ४११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.चोरीच्या घटनेमुळे नवरगावात खळबळ उडाली असून चोरी करणारे व चोरीचे साहीत्य घेणारे हादरले आहेत.