श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
ब्रम्हपुरी
तालुक्यातील तोरगाव (मोठा) गावातील शेतशिवारात वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक:-३/११/२०२२ला सकाळी:-१०:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.
जाईबाई तुकाराम तोंडरे वय:- ५५ वर्ष तोरगाव (मोठा) रहिवाशी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की जाईबाई नामक महिलेच्या शेतावर धानपिकाची लागवड केली. धानपिकाचे पीक कापणीला आले असुन ते धानपिकाची कापन करण्यात आली. व कापनी केलेल्या धानपिक जमा करून धानपिकाचा पुंजना तयार करण्यात आला. धानपिकाचा पुंजना करीत असतांना काही ठिकाणी धानापिकाची लोंब पडलेली होती तो “सर्वा” (ग्रामीण भागातील शब्द) वेचायला जाईबाई ही शेतावर गेली असता बांधाआड दबा धरून बसलेल्या वाघाने जाईबाई वर हल्ला करुन ठार केलें.
जाईबाईच्या पश्चात कुटुंबात एकूण सात जण असा आप्त परिवार आहे. जाईबाईच्या जाण्याने तोंडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन तोरगाव(मोठा)गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.
संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबंधित वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा तसेच जाईबाईच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तोरगाव (मोठा) ग्रामवासियांनी केली आहे.