दुचाकीची सायकलला धडक

यदु चापडे, न्युज जागर प्रतिनिधी धानोरा

– धानोरा तालुक्यातील काकडवेली गावा जवळ दुचाकी वाहनाची सायकलला धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धानोरा- गडचिरोली मार्गावरील काकडवेली येथे घडली. डोक्यात हेल्मेट घातलेले नसल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

डेव्हिड गुरनुले (३५) रा. धानोरा असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात सायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे. डेव्हिड हा धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तो आपल्या दुचाकीने एकटाच कामानिमित्ताने धानोरा येथून गडचिरोलीकडे जात होता. काकडवेली येथे सायकलला धडक बसल्याने रोडवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती धानोरा ग्रामीण रुग्णालयाला मिळताच डॉक्टर व ऍम्ब्युलन्स पाठवून त्याला त्वरित गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.