श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
पंचायत समीतीच्या माजी सभापती यांच्या निवासातून जप्त
नवरगाव
सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथील अंगणवाडी दरवाजाचा कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोलरची बॅटरी व इन्व्हरटर चोरी झाल्याची घटना सोमवार रात्रौच्या सुमारास घडल्यानंतर मंगळवार ला घटना उजेडात आली होती. अखेर सिंदेवाही पोलीसांनी तपास सुरु केल्यानंतर मिळालेल्या प्राप्त माहीतीनुसार चोरी गेलेले विदयुत उपकरण पोलीसांच्या हाती लागले आहे.
नवरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसेवा प्राथमिक शाळेजवळील अंगणवाडी अनुक्रमांक ४ करीता आंगणवाडीकरिता आरो मशीन , फॅन , लाईट या इलेट्रिक उपकरणाच्या वापरासाठी सोलर सिस्टीमसह बॅटरी , इनव्हरर्टर देण्यात आले होते. नेहमीत वेळात अंगणवाडी सुरु असतांना अंगणवाडीचा दरवाजा कुलूपबंद केल्यानंतर मंगळवार सकाळी १० वा. अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सुरू करण्याकरीता आली असता अंगणवाडीचे दरवाजाची कडी वाकलेल्या खुल्या अवस्थेत दिसून आल्याने दरवाजा उघडून आत बघताच सोलरचे उपकरण बॅटरी व इनव्हरर्टर चोरी गेल्याचे निदर्शनात आले. सदर घटनेची माहीती सरपंच व पोलीस विभागाला देण्यात आल्यानंतर पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
सिंदेवाही पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून तपास चालू केली असता पोलीसांना मिळालेल्या प्राप्त माहीतीनुसार चोरी गेलेले उपकरण सिंदेवाही पंचायत समितीच्या माजी सभापती मंदा बाळबुध्दे यांच्या रत्नापूर इंदीरानगर निवासी घरून जप्त केले. सदर घर त्यांचे पती राजेश्वर बाळबुध्दे यांचे नावे असून त्यांनी विनोद नुतीलकंठावार यांचे कडून विकत घेतल्याचे पोलीसांना सांगितले आहे. सिंदेवाही पोलीसांनी चोरी गेलेले उपकरण जप्त करून तपासात सहकार्य करण्याचे सुचना देवून राजेश्वर बाळबुध्दे यांना सोडण्यात आले आहे. अंगणवाडीचे विदयुत उपकरण चोरी करणाऱ्यांचा सिंदेवाही पोलीस शोध घेत आहे. चोरीचा माल घेणे ही गुन्हा आहे त्यामुळे सिंदेवाही पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पोलीसांसमोर आव्हान ठरले आहे.