श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
सध्या धान कापनीचे व मळनीचे काम शेतात सुरु आहे.त्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्ग आपल्या शेतात धान (सर्वा वेचनी )साठी जात आहेत. पण आता शेतकऱ्यांच्याच बांधावर वाघ येऊन मानवाच्या नरडीचा घोट घेत असल्याने शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.गुरुवारला ब्रम्हपूरी तालुक्यातील तोरगांव येथिल जाईबाई तुकाराम तोंडरे (६०) महिला आपल्या टेकरी येथिल शेतात धानाचा सर्वे वेचत असतांना दाबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन नरडीचा घोट घेत तिच्या शरीराचे लचके तोडल्याची घटना घडली.परीसरात वाघाच्या संदर्भात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.त्यामुळे शेता मध्ये काम करणे आता अवघड झालेआहे.साधारणतःहा गावातील लोकांच्या शेत्या ह्या जंगलाला लागुन आहेत. शेतावर पाण्याची सोय केली असल्याने शेतकरी आपल्या शेताता बाराही महीणे भाजी पाल्याचे उत्पन्न घेतल्या जाते.तर वाघाच्या दहशती मुळे शेतात जायचे कसे आता हा प्रश्न निर्माण होत आहे.त्याच बरोबर शेतकरी कुटुंबाचा उदहर्निवाह म्हणून बकर्या व गायी म्हसी पाळत असतात.त्यांना चराईसाठी वनात जावे लागते. आपला जिव मुठीत धरुन आपल्या पाळीव प्राण्याला चारुन आणावे लागते.महीण्याभरा पुर्वी पान्होळी येथिल कक्ष क्रमांक ६६९ या वनात सत्यवान पंढरी मेश्राम (६०) हा गुराखी आपल्या स्वताच्या घरच्या शेळ्या चारण्या साठी वनात गेला होता तेव्हा दाबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली.कुटुंब प्रमुखाला उदर्हरनिर्वाह साठी शेतात किंवा वनात जावेच लागते.पण वाघाची भिती निर्माण झाली.त्यामुळे घरचा जिव कधी घरी परत येतो याच्या कडे कुटुंबीय डोळे लाऊन वाट बघत असल्याचे चिञ आता गावात निर्माण झाले आहे.वनविभागाने शेतकऱ्यांना व गुराख्यांना सतर्क राहण्याचे सुचनाही केल्या आहे.म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जातांना.सावधान ! वाघ येतोय आता बांध्यावर असे म्हणायची वेळ आली आहे.