श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भद्रावती – माजरी वरून भद्रावतीकडे दुचाकी घेऊन परिवारासह बाहेरगावी जाण्याकरता निघाले असता नवीन कोंढा गावाजवळ समोरून येणाऱ्या मारोती कारणे दुचाकीला एवढी जोरदार धडक दिली की त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर पत्नी व दोन मुली गंभीर जखमी असून त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली .
राजेश मोतीलाल पिसे वय ३४ वर्षे राहणार माजरी असे अपघातातील मृतकाचे नाव आहे. तर पत्नी रोशनी पिसे वय ३७ वर्ष, मुली कु.गौरी पिसे ५ , कु, अरण्या पिसे वय ३ असे गंभीर जखमींची ची नावे आहे, राजेश आपल्या परिवाराला घेऊन युपी येतील खागा आपल्या गावी जाण्याकरता चंद्रपूर ट्रॅव्हल्स पकडण्याकरता एमएच ३४ के वाय २६६१ ने निघाला असता नवीन कोंढा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कार एमएच ३४ बी बी ०१०९ नी समोरासमोर धडक दिली यात राजेश चा जागीच मृत्यू झाला ,कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.