जगाला मानवतेचा संदेश देणारे गुरूनानक देव जी यांची जयंती साजरी

श्री.विलास ढोरे ,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज 

जगाला मानवतेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक व शीखांचे प्रथम गुरु, गुरूनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्ताने देसाईगंज येथील गुरुद्वारा गुरुसिंह सभा येथे आमदार कृष्णा गजबे यांनी गुरू ग्रंथसाईब समोर माथा टेकून आशीर्वाद घेतले व समस्त शीख बांधवांना आणि भगिनींना गुरुनानक देव जयंती च्या शुभेच्छा दिल्या.

गुरुनानक देवजींच्या शिकवणी समाजाला नेहमीच सामाजिक सलोखा, एकता आणि सेवा कार्यासाठी प्रेरणा देत राहतील. गुरू नानक देवजींच्या शिकवणीचाच परिणाम आहे की, समाजातील प्रत्येक कार्यात, प्रत्येक संकटात शीख समाज आपल्या सेवा कार्यातून समाजाला मदत करण्यात अग्रेसर राहतो. गुरुनानक जी यांच्या उपदेशाचे पालन करूया, समाजसेवेसाठी आपण मिळून सक्रिय सहभाग घेऊ गुरुनानक देव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

यावेळी आमदार कृष्णाजी गजबे, मोतीलालजी कुकरेजा मा. न.प उपाध्यक्ष, डॉ.लालसिंहजी खालसा गुरुद्वरा गुरूसिंह सभा गुरुद्वारा समिती अध्यक्ष, नंदूजी चावला उपाध्यक्ष, अमजितसिंहजी चावला सचिव, प्रीतपालसिंहजी टुटेजा कोषाध्यक्ष, प्रिन्स अरोराजी सदस्य, इंदरपालसिंहजी खालसा सदस्य, गुरुद्वारा हेड ग्रंथी गुरमितसिंहजी अरोरा यासह शीख धर्मीय बांधव उपस्थित होते.