शाळेत शिक्षक दिले नाही तर आम्ही विद्यार्थी शाळेत पाठविणार नाही:-गावकऱ्यांची मागणी

श्री. अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज ज

ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरीतालुक्यातील जिल्हा परिषदउच्च प्राथमिक शाळा तुलानमाल येथे वर्ग 1 ते 8 असून 82 मुली व 77 मुले एकूण159 विद्यार्थी आहेत. शाळेत 05 शिक्षक होते. परंतु बगमारे सर व तोंडरे सर या शिक्षकाची बढती झाल्यामुळे ते दुसऱ्या शाळेत गेल्याने शाळेत फक्त 03 शिक्षक उरले आहेत. वर्ग1 ते8आहेत पण शिक्षक मात्र तिन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिकविणार कोण? वर्गाचे नियंत्रण कोणाचे?विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार की, नावाचीच शाळा असे अनेक प्रश्न असल्यामुळे निवेदन दिल्यापासून आठ दिवसाच्या आत शाळेत 03शिक्षक न दिल्यास आम्ही विद्यार्थी शाळेत पाठविणार नाही असे निवेदनात मा.गटविकास अधिकारी प स ब्रम्हपुरी, गटशिक्षणाधिकारी प स ब्रम्हपुरी, माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार याना दिले. निवेदन देतांना पूनम कसारे सरपंच ग्रामपंचायत तुलानमाल,उपसरपंच राजकुमार कुत्तरमारे,संजय हनवते अध्यक्ष शाळा समिती, रामप्रसाद मडावी पोलीस पाटील, राकेश कार, सुनीता हनवते, दुर्गा कार, पंकज चहादे, आसाराम मडावी, तुकाराम मडावी, सुधाकर हनवते, संगीता हनवते, गोकुळ मिसार, भोजराज मरस्कोले,विलास घोडमोडे,प्रकाश ठाकरे व गावकरी उपस्थित होते.