दगडाने ठेचून वृद्ध इसमाचा खून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

शेगाव पोलिसाची कारवाई सुरू 

शेगाव बू

स्थानिक शेगाव बू येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथे आज सकाळ च्या सुमारास एक अज्ञात इसमाचा मृतदेह चारगाव ते वायगाव मार्गावरील एक झुडपाआड आढळला .तेव्हा याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव बु. येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांना दिली असता. आपले पोलीस पथक घटनस्थळी दाखल करून पंचनामा करण्यास सुरुवात केली . याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा श्री आयुष नोपानी यांना दिली असता सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास केला असता अज्ञात मृतक याची ओडख पटली असून सदाशिव महाकुडकर रा. भेंडाळा अंदाजे वय 55 वर्ष येथील असल्याचे समजले.

मृतक सदाशिव हा वायगाव भो.येथे एका संबंधित नातलगाच्या घरी गेला होता दरम्यान माझी कोर्ट कचेरी ची तारीख आहे असे सांगून तो घरा बाहेर निघाला .असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान दिनांक 10 रोज गुरुवार च्या रात्री या मृतक इसमावर हल्ला बोल करून दगडाने ठेचून जागीच ठार केले. सदर घटना ही दिनाक 11तारखेला सकाळ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली . मृतक सदाशिव ला दारूचे व्यसन देखील होते दरम्यान त्यांच्या जवळ पाचशे रुपये चा बंडल असल्याची गावात चर्चा आहे. तेव्हा पैशामुळे याचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मृतकाच्या डोक्यावर व नरडी जवळ दगडाने वार करून जागीच ठार केले विशेष म्हणजे हा खून की घातपात आहे याचा अधिक उलघडा करण्या करिता श्वान पथक चंद्रपूर चे पथक दाखल करण्यात आहे होते तेव्हा श्वान पथक यांनी घटना स्थळाची सखोल चौकशी केली परंतु आरोपीचा शोध लागला नव्हता. तेव्हा याचा अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव बू चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली श्री प्रवीण जाधव psi , श्री महादेव सरोदे psi , श्री विठ्ठल वैद्य , राकेश तुरानकर , मदन येरणे , पूर्शोतम दातारकर आदी पोलीस शिपाई पुढील तपास करीत आहे..