जिवती ठाणेदार जगताप वर तात्काळ कारवाई करुन निलंबित करा-प्रियाताई झांबरे यांची मागणी

 श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी भारत च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष आणी आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी गृहविभागाकडे जिवती ठाणेदार जगताप वर तात्काळ कारवाई करुन निलंबित करण्याची केली मागणी

उप सचिव गृहविभाग यांच्या पत्राकडे चंद्रपुर पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, ठाणेदार जगताप च्या बचावात मग्न

चंद्रपुर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी अद्यापही गाढ झोपेत, जगताप च्या भ्रष्टाचाराकडे होत आहे दुर्लक्ष

जिवती पोलीस स्टेशन ला कार्यरत, कर्तव्यदक्ष ठाणेदार जगताप हे खऱ्या अर्थाने आपल्या पदाचा वापर करतांना दिसत आहेत . २६ जानेवारी २०२२ ला प्रभारी तहसीलदार चिडे यांनी रेती भरलेली हायवा गाडी क्रं एम एच ३४ ए वी २८९१ पकडली, गाडी मालकांनी गाडी पडवुन नेल्यामुळे तहसीलदार चिडे यांनी तालुका दंडाधिकारी असल्यामुळे संपुर्ण होश मध्ये पोलीस स्टेशन जिवती मध्ये लेखी तक्रार दिली. दिनांक २८ तारखेच्या वृत्तपत्रात बातम्या प्रकाशीत झाल्या, तहसीलदार यांनी जगताप कडे लेखी तक्रार दिली तेव्हा ठाणेदार जगताप नी ,तात्काळ कारवाई करायला पाहिजे होती. परंतु ठाणेदार जगताप यांना तहसीलदार चिडे यांनी खोटी तक्रार दिली की खरी यांची सहानिशा / चौकशी करु लागले. त्यानंतर तहसीलदार चिडे यांना चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही असे तोंडी सांगुन केस बंद केली. म्हणजेच तहसीलदार चिडे यांनी सुद्धा तोंडी दिलेल्या माहितीवरुन हायवा गाडी मालक सदाम शेख यांचेवर कोणतीही कारवाई न करता शांत बसले.

ठाणेदार जगताप यांनी कशाप्रकारे चौकशी केली असावी. जर पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्तांना जप्तीनामा ,नोटीस हाती लागु शकतात तर ठाणेदार पदावर कार्यरत असणारे जगताप यांना चौकशी मध्ये निष्पन्न का झाले नसावे ?? खरंच चौकशी केली असावी की चौकशी चे सोंग घेऊन उगीचच जगताप जनतेची दिशा भुल करत आहेत.

२६ जानेवारी २०२२ पासुन रेती तस्करांचा विषय चिडे व जगताप ला नाही तर वरिष्ठांना सुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातुन माहीत झाले परंतु शासनाचे होत असलेल्या नुकसानी बद्दल तहसीलदार चिडे आणी ठाणेदार जगताप किंवा वरिष्ठांना काय घेण देनं, माहगाई चा मार तर आम जनतेला सहन करावा लागतो. ठाणेदार जगताप ला तर गृहविभागाकडुन पगार मिळतोच वरुन रेती माफीया कडुन वरची रक्कम, म्हणुनच सदाम शेख सारखा रेती तस्कर पोलीस ठाणेदार व तहसीलदार चिडे वर चढ आहे. वर्दी च्या समोर रेती माफीया वजनदार ठरला असे प्रियाताई झांबरे यांनी आरोप केला आहे .

ठाणेदार जगताप व्हिडीओ मध्ये स्पष्ट बोलत आहेत की कार्यालयातील संबधीत बाबू नी पत्र काढले. जरी कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पत्र काढले असेल तरी तहसीलदार चिडे हे कार्यालयात गांजा पिऊन येतात काय?? नशेत असतात काय?? कोणीतरी पत्र काढले आणी तहसीलदारांनी सही केली. कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना धमकावुन सही घेतली तर नसावी?? ठाणेदारांचे वाक्य ऐकुन फार मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहविभाग मंत्रालय मुंबई चे उप मुख्य सचिव कुलकर्णी साहेब यांनी दिनांक ११/१०/२०२२ ला तक्रारीसोबत चे सर्व पुरावे पाहुनच १३ आँक्टोबर २०२२ ला तात्काळ चौकशी करण्यात यावी म्हणुन पत्र काढले मात्र, चंद्रपुर पोलीस प्रशासनानी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच दिनांक १८ तारखेला पोलीस महासंचालक मुंबई यांचेकडुन विशेष पोलिस महानिरीक्षक नागपुर यांचेकडे सुद्धा पत्र गेले आहे. तरी अद्याप पोलीस विभागाकडुन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असे प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले आहे.