गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंग व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सौ. स्नेहा गुरुदेव सातपुते नगरसेविका नगर पंचायत चामोर्शी यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसाचिवपदी नियुक्ती केली. स्नेहा सातपुते या महाराष्ट्रातील कमी वयाच्या नगरसेविका आहेत…
युवक काँग्रेस च्या बळकटीकरणासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्नेहा सातपुते यांना मोठी जबाबदारी सोपवली असून आपल्या पदाचा उपयोग करून युवक काँग्रेसला अधिक मजबूत करतील अशी अपेक्षा युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नियुक्ती पत्र देताना व्यक्त केले.
सौ.स्नेहा सातपुते यांनी निवडीचे श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आमदार विजय वडट्टीवार, माजी आमदार तथा आदिवासी काँगेस प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , सतीश भाऊ विधाते शहर अध्यक्ष गडचिरोली,
नितीनभाऊ वायलालवार गटनेता काँग्रेस तथा नगरसेवक नगर पंचायत चामोर्शी, जयश्री ताई वायलालवार नगराध्यक्ष नगर पंचायत चामोर्शी , वैभव भाऊ भिवापुरे बांधकाम सभापती न. प. चामोर्शी, चंद्रकांत बुरांडे उपनगराध्यक्ष न. प. चामोर्शी, सुमेध तुरे सभापती न. प. चामोर्शी, प्रेमा आईचवार सभापती न. प. चामोर्शी, वर्षांताई भिवापुरे नगरसेविका न. प. चामोर्शी
तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ भगत यांना दिले .