श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
ब्रम्हपुरी:स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँन्ड ज्युनिअर काँलेज येथे बालकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विद्यालयाचे व्यवस्थापक फादर कुरीयन, मुख्याध्यापिका सिस्टर पावना,उपमुख्याध्यापिका सिस्टर जिन्सिटा प्रामुख्याने उपस्थित होत्या.
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतभर बालकदिन म्हणुन साजरा करण्यात येतो.त्या निमित्याने विद्यालयातिल शिक्षकवर्गांनी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या सर्व अतिथिंनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर शिक्षकांनी परीपाठ सादर केला.तसेच प्राथमिक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसाठी अप्रतिम नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या निमित्याने विविध स्पर्धेंची बक्षिसे विद्यार्थ्यांना देवुन त्यांचा गाैरव करण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन स्मिता भुते यांनी तर आभार प्रदर्शन शिला बुराडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लेकराम डेंगे,अमोल बुरले,विकास राऊत,राजेश माटे यांनी अथक परीश्रम घेतले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.