भगवान बिरसा मुंडा व शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार-आमदार डॉ देवरावजी होळी

श्री.नंदकिशोर नल्लुरवार,प्रतिनिधी,न्यूज जागर 

 

आपले जन्मगाव रायपूर येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचे केले भूमिपूजन

भगवान बिरसा मुंडा वाचनालयाचे रायपुरात केले उद्घाटन

वडील स्वर्गीय मादगुजी चैतुजी होळी, मोठे भाऊ साधूजी मादगुजी होळी व वहिनी सौ मंजुळादेवी साधूजी होळी यांच्या स्मृति प्रित्यर्थ पुतळ्यांची व वाचनालयाची उभारणी करीत असल्याचे प्रतिपादन

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून रायपुरात विविध कार्यक्रमांच्या आयोजन

दिनांक १५/११/२०२२ गडचिरोली

आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व शहीद वीर बाबुरावजी शेडमाके यांचे स्मारक आपल्या गावी असावे असे स्वप्न आपण बाळगले होते त्या स्वप्नाची पूर्तता आता होत असून आपले वडील स्वर्गीय मादगुजी चैतुजी होळी, मोठे भाऊ साधूजी मादगुजी होळी व वहिनी सौ मंजुळा देवी साधूजी होळी यांच्या स्मृति प्रित्यर्थ लवकरच रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा व वीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी गडचिरोली भाजपाचे तालुका अध्यक्ष राम रतनजी गो, चामोर्शीचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे अध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, कारवाफ्याचे डॉक्टर चौधरी साहेब, रायपूर ग्रामसभेचे सुभाष भाऊ वेळदा, अरविंद उईके, पदाभाऊ, खोब्रागडे जी , यांचे सह परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपले वडील , मोठे बंधू व वहिनी यांच्या स्मृतिपित्यर्थ भगवान बिरसा मुंडा वाचनालयाचेही उद्घाटन केले परिसरातील आदिवासी व गैरआदिवासी विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी या वाचनालयाचेही उद्घाटन केले

भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुरावजी शेडमाके हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांच्या कार्याची प्रेरणा भविष्यातील आपल्या पिढीला कायमस्वरूपात मिळत राहावी, त्यांची प्रतिमा आपल्यासमोर नियमित उभी राहावी याकरिता आपण आपल्या जन्मगावी रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुरावजी शेडमाके यांचे स्मारक व्हावे असे स्वप्न बाळगले होते आता ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन या भूमिपूजन प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.