राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघात मोटरसायकल वरील पती-पत्नी जागीच ठार

करंजी गावा जवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघात मोटरसायकल वरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ट्रक आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत मोटरसायकलवर असलेले पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.

नागपूरकडून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक युपी.९२टी.३५६९गडचांदूर येथील मोटरसायकल क्रमांक एम. एच. ३४ बी. एक्स. ६७३९ यांचा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात मोटरसायकलवर जात असलेले गोकुळदास लांडगे (वय ५०) सुनिता गोकुळदास (वय ४५) या दोघा पती-पत्नीं जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरतात नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलिस करत आहे.