श्री. अनिल गुरनुले,अहेरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
मूलचेरा…तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी विद्यार्थी संघ मलेझरी या उपशाखेकडून कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले.या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
या सामन्याचे सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त नायब तहसीलदार कुबडे तर अध्यक्ष म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार ,संवर्ग विकास अधिकारी रामटेके,राजेंद्र चौथाळे, मारोती कोहळे,आविस सल्लागार कवडू चल्लावार, भगीरथ गायकवाड,रामचंद्र सडमेक, विनोद झाडे, विजय मांदाळे, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोहूर्ले, माजी सरपंच विजय कुसनाके,चहारे सर,आकरे सर, ऍड. आकदार, मांडाळे साहेब, प्रभाकर वेव्हरे, शिडाम, विनोद गेडाम, जुलेख शेख,संदीप बडगे, माजी ग्राम पंचायत सदस्य विनोद झाडे, नदीम सय्यद आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कबड्डी सामन्याचे उदघाटन येथील क्रिडांगणावर माजी आमदार आत्राम यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली.
यावेळी माजी आमदार आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी कबड्डी या स्पर्धेविषयी उपस्थित खेळाडूंना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या 21 हजार रु रोख तर द्वितीय पुरस्कार आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पंधरा हजार रु रोख तृतीय पुरस्कार अकरा हजार रोख येथील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मंडळाकडून ठेवण्यात आले.
कबड्डी सामन्याचे उदघाटन सोहळा यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश नागोसे,उपाध्यक्ष तुफिन गायकवाड,कोषाध्यक्ष संदीप येलमुले,सचिव दिलीप चल्लावार, क्रिडा प्रमुख आकाश राऊत सह मंडळाचे कार्यकारी सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या उदघाटन सोहळ्याला क्रिडाप्रेमींसह गावकरी व आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांगण मोठया संख्येने उपस्थित होते.