श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
भद्रावती
मानवी जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन असे म्हटले जाते पण या जीवनात पहिले पाऊल ठेवताच कपाळावर अनाथ म्हणून शिका लागत असेल तर पुढच्या आयुष्याचे काय? कुणीतरी एका अज्ञात मातेने बाळाला जन्म दिला आणि बदनामी पोटी ती त्याला वाऱ्यावर सोडून निघून गेली. आता त्या निष्पाप बाळावर जन्मता अनाथ होण्याची पाळी आल्याची हृदयद्रावक घटना भद्रावती येथे घडली.
पोटच्या बाळासाठी प्रसंगी जीव देणाऱ्या माता आपण पाहिले आहेत .बाळाची तब्येत बिघडली तरी रात्र रात्र जागून काढणाऱ्या माताही आपण नेहमी बघतो, परंतु आई या शब्दाला कलंक लावणारी अज्ञात माता भद्रावती शहरात निर्माण झाली .या अज्ञात मातेने आपल्या नवजात बालकाला सरळ देवाच्या हवाली करून आपले पाप लपविण्याचा प्रयत्न केला असून अद्यापही ती अज्ञानाच आहे या पापी अज्ञात मातेबद्दल शहरातील स्त्री वर्गात मोठा आक्रोश आहे.
दिनांक आठ नोव्हेंबरला सकाळी शहरातील चंडिका मंदिर परिसरात एक नवजात जिवंत अर्भक आढळून आले. त्या अर्भकाचे नसीब बलवंत म्हणून ते जिवंत स्थितीत आढळले व लगेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आधी प्रथमोपचार करून नंतर त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल केले .या त्वरित झालेल्या कारवाईमुळे त्या बिचार्या अभ्रकाचे प्राण वाचले असले तरी कपाळावर अनाथाचा शिक्का घेऊन त्याला आता आपले समोरील आयुष्य काढावे लागणार आहे. मात्र या कलंकीत मातेचा अद्यापही शोध लागू शकला नाही. एखाद्या प्रेमप्रकरणातून या अनौरस बाळाचा जन्म झाला असावा व आपले पाप लपविण्यासाठी या निष्पाप बाळाला उघड्यावर टाकून दिले असावे असा अंदाज शहरातील नागरिक व्यक्त करीत आहे. एक स्त्री ही इतकी निष्ठुर होऊ शकते हे या उदाहरणाने दाखवून दिलेले आहे. पोलीस अद्यापही या बाळाच्या अज्ञात मातेला शोधण्याचे प्रयत्न करीत असून त्यासाठी आशा वर्कर च्या साह्याने घटना परिसराचा व शहराचा परिसर पिंजून काढत आहे, मात्र ही अज्ञात माता अजूनही समोर आलेली नाही .या घटनेमुळे त्या अज्ञात मातेची तिच्या पापातून तर सुटका झाली पण या बाळाच्या भविष्याचे काय? असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे .या निष्पाप बाळाची काय चूक होते होती? की त्याला आता जन्मभर एक अनाथ म्हणून आपले जीवन काढावे लागेल. एखादा योग्य दत्तक घेणारा मिळाल्यास त्या बाळाचे उर्वरित आयुष्य सार्थक लागेल मात्र जर त्याला वाली न भेटल्यास त्याचे समोरील अख्खे आयुष्य उध्वस्त होईल तेही एका कलंकित मातेमुळे या घटनेतून ‘माता तू वैराणी’ असेच म्हणावे लागेल.