चिमूर तालुक्यातील रेती माफीयावर करवाई करा – भिम आर्मी संविधान रक्षकदलची मागणी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि. २२/११/२०२२

चिमूर

चिमूर तालुक्यात सध्या अवैध रेती तस्करी जोरदार होत असून, रोज रात्री मोठेगाव, नेरी, शिरपूर, खडसंगी या भागातून रेती तस्करी केली जात असते. मात्र हा सर्व प्रकार महसूल विभाग आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहत असते. मात्र रेती तस्करावर करवाई करण्यासाठी महसूल विभाग समोर धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

चिमुर तालुक्यात सध्या रेती तस्करांचा बातम्या रोज चर्चेत येत आहे मात्र याकडे गांभीर्याने प्रशासन व कोणीच रेतीचा विषय घेतांना दिसुन येत नाही प्रशासन हतबल झाले की काय असाही प्रश्न चर्चेत येत आहे. चिमूर तालुक्यात रोज दिवसा रात्री रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होतांना दिसुन येत आहे. रेती तस्करीच्या अनेक तक्रारी होत असतात मात्र प्रशासन कार्यवाही करण्यास पुढे का येत नाही असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. रेती तस्करासोबत प्रशासनाचे आर्थिक साटेलोटे तर नाही ना..! अशी चर्चा तालुक्यात नागरिक चर्चा करीत आहेत. असे असतांनाही रेती तस्करावर कार्यवाही होताना दिसून येत नाही. असेही नागरिकांत चर्चा होत आहेत.

या रेती तस्करीवर आळा घालण्यात येवून रेती माफीयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिम आर्मी संघटनेने उपविभागीय अधिकारी चिमुर यांना दिलेल्या निवेदनातुन रेती तस्करावर तात्काळ करवाई करावी अशी मागणी केली आहे. या रेती माफीयावर कारवाई करण्यास तालुका महसूल प्रशासन मौन धारण करुन पुढे येत नसेल व पत्रकार बांधवांना संरक्षण मिळत नसेल तर भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य चिमुर तालुका प्रमुख जगदीश मेश्राम यांच्या वतीने वरिष्ठांना कळविण्यात येईल व नागपुर येथील डि.सी.आर. विभागीय कार्यालया समोर संवैधानिक लोकशाही मार्गाने आदोलन करण्यात येईल असा ईशारा दिलेल्या निवेदनातुन केला आहे. प्रशासनातील संबधीतांनी याची वेळीच दखल घ्यावी व कारवाई करावी अशी मागणी भिम आर्मी संविधान रक्षकदल संघटनेमार्फत करण्यात आली आहे.